Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojana या योजनेला ‘पंतप्रधान सुकन्या योजना’ असे देखील म्हणतात. हि केंद्र सरकारची लहान मुलीसाधीची महत्वाची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानअंतर्गत ही योजना 22 जानेवारी, 2015 रोजी देशभरात सुरू केली आहे.हि योजना केंद्र शासर्काराची सर्वात कमी गुंतवणुकीची विशेषतःमुलीसाठीची योजना आहे. मुलींच्या लग्नाच्या वेळेस किंवा उच्च शिक्षण घेत असताना या योजनेत केलेली गुंतवणूक खूप फायद्याची ठरते.
केंद्र आणि राज्य शासनाद्वारे पोस्ट ऑफिसमार्फत आणि बँकां गुंतवणुकीच्या व बचत ठेवीच्या पुष्कळ चांगल्या प्रकारच्या नवीन नवीन योजना नेहमी राबविल्या जातात. अशीच एक sukanya Samriddhi yojana/सुकन्या समृद्धी योजना ही एक मुलींचे आरोग्य, शिक्षण, लग्न,आणि त्यांच्या उत्तम भविष्यासाठी बचत आणि गुंतवणूकी ची योजना आहे. यामध्ये मुलींच्या पालकाकडून यांच्याकडून कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा National/राष्ट्रीयकृत बँकेत मध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी घेता येतो. या योजने अंतर्गत उखडलेल्या पोस्ट किंवा बँक खात्यास सुकन्या समृद्धीखाते/Sukanya Samriddhi yojana Account असेही म्हणतात.
Sukanya Samriddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजना काय आहे?
What is Sukanya Samriddhi Yojana ?
सुकन्या समृद्धी या योजनेअंतर्गत सुकन्या समृद्धी बँक खाते किंव्हा सुकन्या समृद्धी पोस्त खाते उघडून मुलीचे पालक सुकन्या समृद्धी बँक किंवा पोस्ट खात्यात दरवर्षी कमीतकमी रु. 250/- किंवा जास्तीत जास्त 1.5 लाख पर्यंत रक्कम भरून गुंतवणूक करण्यास सुरू करता येते. जेव्हा पासून खाते उघडतो तेव्हा च्या तारखेपासून ते मुलीचे 21 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीच्या लग्नाच्यावेळी योजनेची मॅच्युरिटी होते व चांगल्या व्याजदराने गुंतवणुकीची वाढीव रक्कम मुलीला शिक्षणासाठी किंव्हा लग्नासाठी मिळते.
Sukanya Samriddhi Yojana/सुकन्या समृद्धी योजनेचे स्वरूप आणि माहिती
![](https://shankarlila.com/wp-content/uploads/2024/06/Sukanya-Samriddhi-Yojana-1024x576.webp)
Sukanya Samriddhi Yojana ही केंद्र सरकारची एक मुलीसाठीची कमी ठेवी असलेली योजना आहे. ही योजना मुलीच्या येणाऱ्या शिक्षणासाठी आणि लग्नाचा खर्चासाठी रक्कम उभी करण्यास तिच्या पालकांना प्रोत्साहित करते जी “बेटी बचाव बेटी पढाओ” या अभियानांतर्गत माननीय पंतप्रधानांनी दिनांक 22 जानेवारी 2015 रोजी चालू केली. या योजनेचा मुख्य उद्धेश मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागवण्याच्या आहे.मुलीच्या वयाची अवधी आठ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे तिथे सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीचे पालक सार्वजनिक क्षेत्रातील बँका व काही अन्य बँकांमध्ये किंव्हा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रांसह मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात. एक मुलींसाठी एकच खाते उघडू शकतो. एका कुटुंबात दोन पेक्षा जास्त मुली असेल फक्त दोनच सुकन्या समृद्धी योजनेचे खाते चालू करू शकतील. यासाठी कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रुपये दरवर्षी भरण्याची सवलत आहे. केंद्र सरकारने या योजनेचे दिनांक 14 डिसेंबर 2014 रोजी अधिकृत सूचना दिली होती
सुकन्या समृद्धी योजनेचे महत्वाचे मुद्दे
• कमीत-कमी 250 रुपये भरून मुलेचे पालक खाते उघडू शकतात.
• वर्षाला कमीतकमी 250 रुपये आणि जास्तीतजास्त 1 लाख 50 हजार रुपये गुंतवणूक करता येते.
• जमा केलेली रक्कम, संपूर्ण कालावधीत मिळालेले व्याज आणि मॅच्युरिटी लाभ कलम 80C अंतर्गत करमुक्त आहेत.
• या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 21 वर्षे आहेत.
• सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी 21 वर्षाचा असला तरी योजना धारकाला फक्त सुरवातीच्या 14 वर्षांपर्यंत पैसे भरायाचे असतात.
• मॅच्युरिटी नंतर जर योजना धारकाने खाते बंद केले नाही तर मुदतीनंतरही जमा रकमेवर व्याज मिळत राहते.
• मुलीचे वय 18 वर्षाची झाल्यावर तिच्या उच्च शिक्षणासाठी 50% रक्कम काढता येते.
• खाते चालू केल्यानंतर योजांसाठी गुंतवणूक फक्त पंधरा वर्षापर्यंत पैसे भरावे लागतात.
• हे खाते भारतामध्ये एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करू शकतो.
• मुलीचे वय 21 वर्ष होण्या अगोदर जर मुलीचे लग्न झाले तर सुकन्या समृद्धी योजनाचे खाते आपोआप बंद होऊन जाते.
• दरवर्षी किमान रुपये 250/- सुकन्या समृद्धी खात्यात जमा नाही केले तर खाते बंद होते. मात्र, खाते पुन्हा चालू करण्यसाठी दरवर्षी 50/- प्रमाणे दंड भरुन खाते पुन्हा चालू करू शकतो.
• जर दुर्दैवाने योजना धारकाचा जर मृत्यू झाला असेल तर पालकांना व्याजासाहित जमा असलेली रक्कम मिळते.
• सुकन्या समृद्धी बचत ठेव गुंतवणूक भारत सरकारची 100% सुरक्षित योजना आहे. जास्त 1 लाख 50 हजार रुपये दरवर्षी भरण्याची सवलत आहे. केंद्र सरकारने या योजनेचे दिनांक 14 डिसेंबर 2014 रोजी अधिकृत सूचना दिली होती
सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता आणि अटी
Sukanya Samriddhi Yojana Elifibility
• Sukanya samrudhi yojana account उघडताना मुलीचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असावे.
• पालकांना दोन मुली असतील तर या योजने अंतर्दोगत दोघींसाठी दोन सातंत्र बचत खाती सुरू करू शकतात.
• या योजने मध्ये प्रत्येक मुलीचे एकच खाते असले पाहिजे.
• एका कुटुंबातील फक्त दोनच मुलींचे खाते उघडले जाऊ शकते.
• जर पहिल्या प्रसूती वेळेस जर तिळ्या मुलींचा जन्म झाला असेल तसेच पहिली मुलगी असेल आणि दुसऱ्या प्रसुती वेळी जुळ्या मुलींचा जन्म झाला असेल, तर अशा परिस्थितीत त्या तीनही मुलींच्या नावावर सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुलींच्या जन्म प्रमाणपत्रासह पालकांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्यास उघडता येते.
• या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 21 वर्षे आहेत 21 वर्षानंतर सुकन्या समृद्धी खाते बंद होऊन पैसे पालकांच्या स्वाधीन केले जातील.
![](https://shankarlila.com/wp-content/uploads/2024/02/Sukanya-Samrudhi-Yojana-1024x539.webp)
सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया
Sukanya Samriddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजना खाते कोणत्याही बँक अथवा पोस्ट ऑफिस शाखेमध्ये उघडू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या गोष्टींचा अवलंब करा.
• सगळ्यात अगोदर तुम्हाला ज्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत मध्ये खाते उघडायचे आहे त्या ठिकाणी जा.
• तिथून योजने चा फॉर्म घ्या ,त्यावरील सगळी विचारलेली माहिती भरा.
• सोबत लागणारी कागदपत्रांची झेरॉक्स भरलेल्या फॉर्म ला जोडा.
• या योजनेमध्ये कमीत कमी तुम्ही 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये वर्षाला जमा करू शकता. जितके तुम्हाला जमा करायचे आहे ती रक्कम फॉर्म वर लिहा.
• तुमचा फॉर्म आणि पैसे जमा केल्यानंतर तुमच्या मुलीच्या नावावर samrudhi Sukanya योजनेचे खाते चालू होईल आणि तुम्हाला भरलेल्या रक्कमेची पावती देखील दिली जाईल तसेच या खात्यासाठी तुम्हाला एक पासबुक दिले जाईल
सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
• मुलीचा जन्म प्रमाणपत्र.
• सुकन्या समृद्धी योजना फॉर्म.
• पालकांचे ओळखपत्र उदा. पॅन कार्ड, आधार कार्ड इत्यादी.
• पालकांचा पत्त्याचा पुरावा उदा. लाईट बिल, रेशन कार्ड इत्यादी.
• जन्माच्या एका आदेशानुसार अनेक मुलांचा जन्म झाल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र लागेल आणि सोबत पालकांचे प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे.
सुकन्या समृद्धी योजना व्याजदर
सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर हा भारताच्या अर्थव्यवस्थेतील बदलांवर जास्त-कमी होत असतो. केंद्र सरकार या योजनेचे व्याजदर ठरवते आणि दर तिमाही सुधारित करते आणि जाहीर करते. या योजनेच्या सुरुवातीला म्हणजेच 2015 मध्ये 9.1% इतके व्याजदर देण्यात आले होते. या योजनेचा व्याजदर 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये 7.6% एवढा होता आता तो 2023-24 आर्थिक वर्षासाठी 8% करण्यात आला आहे. हा 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आला आहे. बाकीच्या कुठल्याही स्कीम किंव्हा योजनेच्या तुलनेत सुकन्या समृद्धी योजनेत सगळ्यात जास्त व्याज दर आहे.
![](https://shankarlila.com/wp-content/uploads/2024/02/Sukanya-Samriddhi-Yojana-1.webp)
Sukanya Samriddhi Yojana FAQs
1) सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक कमीत कमी किती पैसे भरता येतात?
उत्तर – सुकन्या समृद्धी योजनेत वर्षाला कमीत कमी 250 रुपये भरता येते.
2) सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीचे वय किती असावे?
उत्तर – सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे.
3) सुकन्या समृद्धी खाते कोण उघडू शकतो?
उत्तर – मुलीचे कायदेशीर पालक मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडू शकतो.
4) सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक जास्तीत जास्त किती पैसे भरता येतात?
उत्तर – सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये भरु शकता.
5) खातेधारकाच्या पालकांचा मृत्यू झाल्यास काय होते?
उत्तर – खातेधारक मुलीच्या पालकांचा जर मृत्यू झाला, तर ही योजना वार्षिक कमीतकमी 250 रुपये भरून चालू ठेवता येते आणि मॅच्युरिटी कालावधीपर्यंत जमा केलेल्या रकमेसह चालू ठेवली जाते आणि मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत जमा रकमेवर व्याज मिळत राहते नंतर त्या मुलीला सर्व रक्कम दिली जाते.
6) अनिवासी भारतीय सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतात का?
उत्तर – अनिवासी भारतीय सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
7) खातेधारकाचा मृत्यू झालास काय होते?
उत्तर – खातेधारक मुलीचा मृत्यू झाला असे खाते बंद केले जाते आणि तिच्या पालकांना रक्कम दिली जाते.
8) मी माझे बचत खाते सुकन्या समृद्धी योजना खात्यात रूपांतरित करू शकतो का?
उत्तर – नाही.
9) मी माझ्या सुकन्या समृद्धी खात्यातून मॅच्युरिटी आधी पैसे काढू शकते का?
उत्तर – नाही पण मुलगी १८ वर्षांची झाली असेल आणि तिच्या शैक्षणिक खर्चासाठी पैशांची आवश्यकता असेल तर अशावेळी मात्र ५०% रक्कम काढू शकता.
10) सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर फिक्स आहे का?
उत्तर – नाही, केंद्र सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेनुसार या योजनेचा व्याजदराचा अभ्यास करून दर तिमाहित सुधारणा करत असते आणि जाहीर करत असते
11) सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण भारतात चालू आहे का?
उत्तर – होय, सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि ती भारतातील प्रत्येक राज्यात चालू आहे.
12) सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलगी किती वर्षाची होईपर्यंत खाते उघडता येते ?
उत्तर – सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलगी 10 वर्षाची होईपर्यंत खाते उघडता येते.
13) मी माझ्या मुलीसाठी एकूण किती खाते उघडू शकतो?
उत्तर – एका मुलीसाठी फक्त एकच खाते उघडता येते.
14) मी माझ्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी खाते कुठे उघडू शकतो?
उत्तर – सुकन्या समृद्धी खाते तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये किंवा अधिकृत बँकांमध्ये उघडू शकता उदाहरणार्थ- एचडीएफसी, पंजाब नॅशनल बँक, union बँक,एसबीआय, आयसीआयसीआय,इत्यादी.