Mukhyamantri Vayoshri Yojana 2024| मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024

Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 | केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजने ची सुरुवात केलेली आहे. या योजनेत या ज्या जेष्ठ नागरीकांच वय 65 वर्षे आहे आणि वार्षिक उत्पन 2 लाखा पेक्ष्या कमी आहे अश्या जेष्ठ नागरिकांना सरसकट 3000/- रुपये मिळणार आहे. हि आर्थिक मदत जेष्ठ नागरिकांचे जीवनमान सुखकर व्हावे यासाठी सरकार उपलब्द करून देणार आहे. सरकारच्या आर्थिक मदतीतून जेष्ठ नागरिक आपल्यासाठी श्रवण यंत्र, चष्मा , फोल्डिंग वाकर, व्हीलचेअर , पाठीसाठी सपोर्ट बेल्ट , कमोड चेयर इत्यादी आवश्यक गोष्टी घेऊन आपले जीवन सुखकर बनू शकता.
या लेखातून आपण हि योजना काय आहे , पात्रता काय आहे , योजनेसाठी अर्ज कसा करावा इत्यादी माहिती सविस्तर पाने बघणार आहे तरी हा लेख पूर्ण वाचा.
योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना

मुख्यमत्री वयोश्री योजना काय आहे

जेष्ठ नागरिकांसाठी हि योजना सुरु केलेली आहे. या नागरिकांना दैनंदिन जीवनात सामान्य स्तीतीत जागत असताना लागणारे साधने आहे जशे कि फोल्डिंग वाकर, पाठीसाठी सपोर्ट बेल्ट, चष्मा, श्रवण यंत्र, कमोड चेयर इत्यादी आवश्यक गोष्टी साठी महाराष्ट्र सरकारकडून 3 हजार रुपये योजना लाभार्ध्याच्या आधार जोडलेल्या बँक खात्यात देण्यात येणार आहे. या योजनेत जेष्ठ नागरिकांच्या शारीरिक दुर्बलता नुसार लागणारे सहायक साधना साठीच मदत मिळणार आहे. वयवृद्ध व्यक्ती जर वयामुळे अशक्त असेल किंव्हा अपंग असेल तर या उपकरणांचा जेष्ठ व्यक्तीला चांगला फायदा होणार आहे. योजनेचा लाभ घेण्यसाठी नागरिकाचे वय 65 वर्ष्यापेक्षा जास्त असावे आणि वार्षिक उत्पन 2 लाख पेक्ष्या जास्त नसावे तरच या योजने साठी अर्ज करू शकता.

मुख्यमत्री वयोश्री योजना थोडक्यात स्वरूप

योजनेचे नावमुख्यमंत्री वयोश्री योजना  | Mukhyamantri Vayoshri Yojana
कोणासाठी सुरु केलीराज्यातील ज्येष्ठ नागरिक
योजनेचा हेतू महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे.
लाभआर्थिक 3000/- रुपये मदत
वयाची अटअर्जदाराचे 65 वर्षा पेक्ष्या जास्त नसले पाहिजे.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन | Online
अधिकृत वेबसाईटअद्याप प्रदर्शित करण्यात आलेली नाही

Mukhyamantri Vayoshri Yojana | मुख्यमंत्री वयोश्री योजने मध्ये मिळणारे उपकरणे खालील प्रमाणे.

योजनेतून दिली जाणारी 3 हजार रुपयाच्या मदतीतून अर्ज करणारे जेष्ठ नागरिक त्यांना शारीरिक गरजे नुसार खालील आवश्यक असलेले उपकरणे घेऊ शकता.

  • चश्मा
  • श्रवण यंत्र
  • स्टिक व्हीलचेयर
  • बॅक सपोर्ट बेल्ट
  • निब्रेस
  • फोल्डिंग वॉकर
  • सर्वाइकल कॉलर
  • ट्रायपॉड
  • कमोड चेयर

Mukhyamantri Vayoshri Yojana | मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता

Mukhyamantri Vayoshri Yojana साठी महाराष्ट्र सरकारने काही प्राथमिक पात्रता ठेवल्या आहे त्या पात्र असेल तर नागरिक योजने साठी अर्ज करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.
• हि महाराष्ट्र सरकारची योजना आहे म्हणून योजनेसाठी अर्ज करणारा जेष्ठ नागरिक हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असने अनिवार्य आहे. या योजने साठी बाहेर राज्यातील जेष्ठ नागरिक अर्ज करू शकणार नाही.
• योजने साठी अर्ज करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचे वय हे 65 वर्षे असावे. जर 65 वर्षा पेक्ष्या कमी असेल तर ते जेष्ठ नागरिक या योजने साठी पात्र ठरणार नाही.
• योजने साठी अर्ज करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखा पेक्षा कमी असावे. जर 2 लाख पेक्ष्या जास्त उत्पन असेल तर ते जेष्ठ नागरिक या जोजाने साठी अर्ज करू शकणार नाही.
• योजने साठी अर्ज करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
• योजने साठी पात्र लाभार्थ्यांना दिलेल्या रु. 3 हजार रकमेचे आवश्यक असलेले उपकरण विकत घेतले या संदर्भातील व प्रशिक्षण घेतल्या संदर्भातील प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडे प्रमाणित करून घेणे गरजेचे आहे.
• योजने साठी अर्ज करणाऱ्या जेष्ठ नागरिकाने मागच्या 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर सरकारी नियंत्रण सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्त्रोताकडून मोफत आवश्यक असलेले उपकरण घेतलेले नसावे.
• निवडलेल्या जिल्ह्यात एकूण Mukhyamantri Vayoshri Yojana च्या लाभार्थ्याच्या संख्यांपैकी 30 टक्के महिला असतील.
जे जेष्ठ नागरिक वरील सर्व निकास पात्र असतील ते मुख्यमत्री वयोश्री योजने साठी अर्ज करून योजनेचा थेट लाभ घेऊ शकता.

Mukhyamantri Vayoshri Yojana Document List | मुख्यमंत्री वयोश्री योजना कागदपत्रे

मुख्यमंत्री वयोश्री योजने साठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करताना खालील कागदपत्रे सादरकरावी लागतील. ऑफलाईन अर्ज करताना या कागदपत्राची झेरोक्स कॉपी लागेल आणि ऑनलाईन अर्ज करताना या कागदपत्राची सोफ्ट कॉपी लागतील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करताना लागणारी खलील कागदपत्रे.
अर्जदाराचे महाराष्ट्र रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
आधार कार्ड
वयाचा पुरावा
अर्जदार जात अपंग असेल तर अपंग असल्याचे प्रमाणपत्र
ओळखपत्र
रेशनकार्ड
राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक
पासपोर्ट फोटो
स्वयम घोषणापत्र
मोबाईल नंबर

Mukhyamantri Vayoshri Yojana | मुख्यमंत्री वयोश्री योजचे फायदे.

मुख्यमंत्री वयोश्री योजचे महारष्ट्रातील जेष्ठ नागरिकांना मिळणारे फायदे खालील प्रमाणे.
आर्थिक सहाय्य: योजने मध्ये प्रत्येक पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला 3 हजार रुपया ची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
जेष्ठ नागरिकांचे स्वावलंबन: मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे ज्येष्ठ नागरिक स्वत:साठी शारीरिक गरजे नुसार आवश्यक असलेले उपकरणे खरेदी करू शकतील ज्यामुळे त्यांची आत्मनिर्भरता वाढणार आहे.
आरोग्य सुधारणा: ज्येष्ठ नागरिक स्वत:साठी शारीरिक गरजे नुसार आवश्यक असलेले उपकरणे खरेदी केल्याने ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि जीवनशैली सुधारेल.

Mukhyamantri Vayoshri Yojana साठी निधी वितरण आणि अर्थ सहाय

1.राज्य शासना मार्फत 100% आर्थिक मदत करण्यात येईल
2.3 हजार रुप्याच्या मर्यादेत निधी थेट लाभ वितरण म्हणजेच DBT प्रणाली द्वारे देण्यात येणार आहे.
3.शिबिराचे आयोजन करणे -प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि उपजिल्हा रुग्णालये सार्वजनिक आरोग्य विभागाची प्रत्येकाला आरोग्यसेवा मिळावी यासाठी ते राज्याच्या विविध जाळे पसरेलेले आहे.संसर्गजन्य रोग सर्वेक्षण आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानामध्ये घरो घरी जाऊन जेष्ठ नागरिकांचे करण्यात येत असते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यांत्रनामार्फत या योजनेच्या लाभार्थ्याची तपासणी करण्यात येईल.

Mukhyamantri Vayoshri Yojana | मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र सरकारमार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजने बद्दलचा महत्वपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय 5 फेब्रुवारी रोजी घेण्यात आला आहे आणि याचा GR म्हणजेच शासन निर्णय 6 फेब्रुवारी 2024 या दिवशी प्रदर्शित करण्यात आला आहे. पण अजून पर्यंत मुख्यमंत्री वयोश्री योजना(Mukhyamantri Vayoshri Yojana) ऑनलाईन नोंदणी अर्ज प्रक्रिया किंवा ऑफलाईन रजिस्ट्रेशन यासंदर्भातील कोणतीही माहिती सरकारने दिलेली नाही. शासन GR नुसार राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे नवे वेगळे स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून प्रदर्शित करण्यात करण्यात येणार आहे आणि पोर्टल तयार झाल्यावर योजनेसाठी जेष्ठ पात्र नागरिक मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करू शकतील.

Mukhyamantri Vayoshri Yojana | मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 हेल्पलाइन नंबर

जर तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजने साठी काही प्रश्न असतील किंव्हा काही शंका असतील तर या 800-180-5129 नंबर वर काल करून मुख्यमंत्री वयोश्री योजनेची सविस्तर माहिती घेऊ शकता आणि तुमच्या शंकाचे निरासारण करू शकता.

FAQ’s

Q. मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे ?
Ans. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजने ची सुरुवात केलेली आहे. या योजनेत जेष्ठ नागरिकांच्या शारीरिक दुर्बलता नुसार लागणारे सहायक साधना साठीच 3000 रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे.

Q. महाराष्ट्र वयोश्री योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील ?
Ans. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे आहे अर्जदाराचे महाराष्ट्र रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, वयाचा पुरावा, अर्जदार जात अपंग असेल तर अपंग असल्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, रेशनकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक,पासपोर्ट फोटो,मोबाईल नंबर ई.

Q. मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत लाभार्थ्यांना किती रुपये मिळतात ?
Ans. Mukhyamantri Vayoshri Yojana | मुख्यमंत्री वयोश्री योजना मध्ये लाभार्थी जेष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये एकरकमी एकवेळी मिळणार आहे.

Q. मुख्यमंत्री वयोश्री योजने चा लाभ घेण्यसाठी वयाची मर्यादा किती ?
Ans. Mukhyamantri Vayoshri Yojana साथ अर्ज करणाऱ्या जेष्ठ नागरिकाचे वय 65 वर्ष पाहिजे.

Q. मुख्यमंत्री वयोश्री योजना साठी पात्रता काय आहे ?
Ans. योजने साठी अर्ज करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचे वय हे 65 वर्षे असावे. वार्षिक उत्पन 2 लाख पेक्ष्या जास्त नसावे. जेष्ठ नागरिक महाराष्ट्राचा कायमचा रहिवाशी पाहिजे.

Q. मुख्यमंत्री वयोश्री योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?
Ans. Mukhyamantri Vayoshri Yojana महाराष्ट्र सरकारची असून टी फक्त राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असणार आहे.

Q. मुख्यमंत्री वयोश्री योजना साठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे ?
Ans. या योजने साठी alimco.in हि सरकारची अधिकृत वेबसाईट आहे.

Q. महाराष्ट्र वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
Ans. ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची वेबसाईट किंव्हा पोर्टल सुरू केलेले नाही. त्यामुळे लवकरच या योजने साठी स्वतंत्र ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पोर्टल सुरू करण्यात येईल आणि सुरु झाल्यानंतर योजने साठी अर्ज करता येईल.

Q. महाराष्ट्र वयोश्री योजनेसाठी बाहेर राज्यतील नागरिक अर्ज करू शकता का ?
Ans. मुख्यमंत्री वयोश्री योजने साठी बाहेर राज्यतील नागरिक अर्ज करू शकणार नाही ते या योजनेसाठी पात्र नाहो. हि योजना फक्त महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आहे.