Lek Ladki Yojana in marathi
Lek Ladki Yojana in marathi | अंतर्गत महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचे ध्येय ठरवले आहे राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. ज्याचे नाव लेक लाडकी योजना 2024 आहे. या योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागास कुटुंबात जन्मलेल्या मुलींना सरकार आर्थिक मदत करेल. लेक लाडकी योजने मध्ये आर्थिकदृष्ट्या मागास तशेच गरीब कुटुंबातील मुलींना एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहे. ही योजना महाराष्ट्रातील सर्व गरीब मुलींसाठी फायद्याची ठरणार आहे. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची घोषणा या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प 2023-24 मध्ये करण्यात आली. ज्या अंतर्गत गरीब पात्र असेलेल्या मुलींना वयाचे 18 वर्षे पूर्ण झाल्यास ₹ 75000 ची रोख रक्कम देण्यात येईल. आज आपण या लेखात जाणून घेणार आहेत महाराष्ट्र लेक लाडकी योजना काय आहे ? लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा आहे ? लेक लाडकी योजना कागदपत्रे कोणती लागणार ? आहेत यासाठी पात्रता काय आहे? त्याचे फायदे आणि हि योजनाऑनलाइन कशी लागू करावी? त्यामुळे lek ladki yojana marathi / लेक लाडकी योजना ही पोस्ट शेवटपर्यंत सपूर्ण वाचा.
लेक लाडकी योजना 2023 लाँच करण्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक वर्ष 2023-24 मुलींच्या सक्षमीकरणासाठी विधानसभेत अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले आहे. या योजनेच्या मुळे राज्यातील गरीब कुटुंबात जन्म झालेल्या मुलींना लाभ दिला जाणार आहे.
मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत 5 हप्त्यांमध्ये आर्थिक मदत सरकारकडून दिली जाईल. आर्थिक मदतीची रक्कम मिळाल्यानंतर मुलीच्या शिक्षणात कोणतीही समस्या अडथळे येणार नाही. त्यामुळे समाजातील मुलींबद्दलची नकारात्मकता बदलू शकते.
लेक लाडकी योजना काय आहे?
What is lek ladaki yojana in marathi ?
महाराष्ट्र Lek ladki yojana 2023 अशा मुलींसाठी जन्मापासूनच त्यांचे आरोग्य, त्यांचे उत्तम शिक्षण आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुरू केली आहे. जेणेकरून मुलींच्या पुढील शिक्षण आणि प्रगतीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही आणि ते शिक्षण, रोजगार आणि तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात यशस्वी वाटचाल करतील.
महाराष्ट्र शासन गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांसाठी अनेक वेगवेगळ्या योजना नेहमी राबवत असते. अशीच एक योजना म्हणजे लेक लाडकी योजना सरकारकडून सुरु केलेली आहे. या योजने मध्ये मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकार एकूण पाच हप्त्यांमध्ये देणार आहे आणि यासोबतच तिला 18 वर्षे पूर्ण झाल्यावर ₹ 75000 एकरकमी रोख दिले जातील.
ही योजना आर्थिकदृष्ट्यादुर्बल , मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबातील मुलींसाठी आहे. त्यामुळे ज्या कुटुंबांकडे पिवळे आणि केशरी रंगाचे राशनकार्ड असणे गरजेचे आहे आणि त्यांनाच या योजनेचा संपूर्ण लाभ घेता येणार आहे.
लेक लाडकी योजना महत्वाचे मुद्दे
Highlights of Lek Ladki Yojana in marathi
योजनेचे नाव | लेक लाडकी योजना | Lek ladki Yojana in marathi |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | 2023-2024 |
उद्दिष्ट | गरीब, आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुली शिक्षित आणि विकसित करणे |
योजनेची सुरुवात | मार्च 2023-2024 च्या अर्थसंकल्पात झाली |
लाभार्थी | महाराष्ट्रातील गरीब, आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुली. |
योजनेत मिळणारी एकूण रक्कम | एक लाख एक हजार रुपये |
लेक लाडकी योजनेचे फायदे
Benifits of Maharashtra Lek ladki yojana in marathi
- लेक लाडकी योजने मध्ये आर्थिक मागास तशेच गरीब कुटुंबात मुलीच्या जन्मावर ₹ 5000 देण्यात येतील.
- मुलगी जेव्हा पहिलीच्या वर्गात प्रवेश घेईल तेव्हा तिला ₹ 6000 ची रक्कम देण्यात येईल.
- जेव्हा मुलगी सहावीच्या वर्गात प्रवेश घेईल तेव्हा तिला 7000 रुपये दिले जातील.
- जेव्हा मुलगी 11वी वर्गात मध्ये प्रवेश घेईल तेव्हा तिला ₹ 8000 देण्यात येईल.
- ज्या वेळेस लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे होईल, त्यावेळेस त्या लाभार्थी मुलीला पुढील शिक्षणासाठी एकदम पूर्ण ₹ 75000 ची रोख रक्कम दिले जाईल.
![](https://shankarlila.com/wp-content/uploads/2024/05/Lek-ladaki-yojana-navya-swarupat-1024x539.webp)
महाराष्ट्र लेक लाडकी योजना पात्रता
Eligibility of Maharashtra Lek ladki yojana in marathi
जर आपल्याला lek ladaki Yojan चा लाभ घ्यायचा असेल, तर सर्वप्रथम त्याची पात्रता काय आहे हे माहिती करून घेणे महत्वाचे आहे, तर मग बघूया लेक लाडकी योजना नियम.
- लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलगी ही मूळची महाराष्ट्राची रहिवाशी.
- केशरी किंवा पिवळ्या रंगाचे राशनकार्ड असलेले कुटुंब या योजनेसाठी पात्र असेल.
- योजने साठी अर्ज करणारा नागरिक महाराष्ट्रातील गरीब व मागासवर्गीय असावा.
- उमेदवार कोणत्याही प्रकारच्या कराच्या / Incometax कक्षेत येऊ नये आणि त्याने कोणताही कर भरू नये.
- उमेदवाराकडे कार, ट्रॅक्टर इत्यादी कोणत्याही प्रकारचे चारचाकी वाहन किंवा मोठे घर नसावे.
- अर्जदार कुठल्याही सरकारी खात्यात किंवा कुठल्याही सरकारी कार्यालयात कार्यरत नसावा.
- अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे उत्पन्न 100000 पेक्षा जास्त नसले पाहिजे.
- दुसऱ्या आपत्यांनंतर वडील किंवा आई दोघांपैकी एकाने कुटुंबनियोजन ची शस्त्रक्रिया करणे गरजेचे राहील.
1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या 1 किवा 2 मुलींना त्याचप्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.
तसेच, दुसय्रा प्रसूतीच्या वेळी जुळी मुले जन्माला आली असेल तर त्यापैकी 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास किंवा दोन्ही मुली असल्यासते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.
Lek Ladki Yojana in marathi
![](https://shankarlila.com/wp-content/uploads/2024/05/लेक-लाडकी-योजना-1024x1024.webp)
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची वैशिष्ट्ये आणि हेतू
Lek Ladki yojana in marathi
- लेक लाडकी योजने मध्ये आर्थिकदृष्ट्या मागास आणि गरीब कुटुंबात जन्म झालेल्या मुलींना लाभ दिला जाणार आहे.
- मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढवणे.
- या योजनेच्या माध्यमातून जन्मापासून ते शिक्षणापर्यंत सरकार कडून आर्थिक मदत दिली जाणार आहे.
- या आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांचे बँकेत खाते असले पाहिजे.
- शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 (शुन्य) वर आणण्यासाठी प्रोत्साहण करणे.
- ही मदत मिळाल्याने कुटुंबाला मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक समस्या चा सामना करावा लागणार नाही.
- सरकारी रुग्णालयात मुलीचा जन्म झालेला पाहिजे.
- मुलींचा मृत्यू दारात कमी करणे तसेच बालवयात होणारे विवाह थांबवणे.
- या योजनेचा फायदा करून घ्यायचा असेल तर मुलीच्या जन्मापासून अर्ज करावा लागेल.
- गरीब कुटुंबात मुलींचा जन्म झाला तरी आर्थिक मदत मिळाल्यामुळे तिचे भविष्य उज्वल होईल आणि मुलीला ओझे मानणार नाही.
- ही योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करेल.
- समाजातील मुलीं बद्दल असलेली विषमता दूर करता येईल.
- कुपोषण कमी करणे.
- या योजनेमुळे राज्यातील मुलींबाबत समाजाचा सकारात्मक विचार तयार होईल.
शेअर मार्केट फंडामेंटल ॲनालिसिस साठी उत्तम पुस्तके
शेअर मार्केटसाठी उत्तम मराठी पुस्तके
महाराष्ट्र लेक लाडकी योजना साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
Documents Require for Maharashtra Lek ladki yojana in marathi.
लेक लाडकी योजने साठी लागणारी महत्वाची कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत-
- पिवळ्या किंवा केशरी रंगाचे राशनकार्ड
- मुलीच्या पालकांचे आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्न प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- जीमेल आयडी
- बँक पासबुक
- पालकांसह मुलीचा फोटो
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
महाराष्ट्र लेक लाडकी योजना साठी अर्ज कसा करावा?
How to apply for Lek Ladki Yojana in marathi
सदर योजने चा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकाांनी 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्या नंतर मुलीचा जन्म झाल्यास संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्तानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्या नंतर, त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविके कडे या शासन निर्णय सोबतच्या परिशिष्टा मध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक त्या कागदपत्राांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज, राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी,जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बळ विकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, विभागीय उपयुक्त महिला बळ विकास यांच्या कार्यालयात उपलब्ध राहील.
योजने साठी शासनाचा निर्णय वाचण्याकरिता येथे क्लिक करा.FAQs of lek ladaki yojana in marathi
Q. लेक लाडकी योजना काय आहे?
Ans. ही योजना आर्थिकदृष्ट्यादुर्बल , मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबातील मुलींसाठी आहे.. या योजने मध्ये मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकार एकूण पाच हप्त्यांमध्ये देणार आहे आणि बरोबर त्या लाभार्थी मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्यावर एकरकमी ₹ 75000 दिले जातील.
Q. लेक लाडकी योजना कधी सुरू झाली?
Ans. हि योजना महाराष्ट्रासाठी 2023-24 चा अर्थसंकल्प महाराष्ट्र सरकारमधील अर्थमंत्र्यांनी जाहीर केला, ज्या अंतर्गत लेक लाडकी योजने ची घोषणा करण्यात आली.
Q. लेक लाडकी योजना 2023 चे फॉर्म कसे मिळवायचे.
Ans. सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज, राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी,जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बळ विकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, विभागीय उपयुक्त महिला बळ विकास यांच्या कार्यालयात उपलब्ध राहील.
Q. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेत किती पैसे मिळणार?
Ans. लेक लाडकी योजनेंतर्गत, सरकार पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना एकूण ₹ 101000 ची रक्कम वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये प्रदान करेल.
Q. लेक लाडकी योजनेसाठी कोण पात्र आहे?
Ans. महाराष्ट्र राज्याचे केशरी व पिवळे राशन कार्ड असलेले फक्त मुलगीच या योजनेसाठी पात्र आहे
Q. लेक लाडकी योजना कागदपत्रे कोणती आहेत?
Ans.
- पिवळ्या किंवा केशरी रंगाचे राशनकार्ड
- मुलीच्या पालकांचे आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्न प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- जीमेल आयडी
- बँक पासबुक
- पालकांसह मुलीचा फोटो
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
Q. लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?
Ans. संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्तानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्या नंतर, त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविके कडे या शासन निर्णय सोबतच्या परिशिष्टा मध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक त्या कागदपत्राांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा