Credit Card Information in Marathi | क्रेडीट कार्ड संपूर्ण माहिती मराठीमधून

Credit Card Information in Marathi

Credit Card Information in Marathi | नमस्कार मित्रांनो तुमचे शंकरलीला या साइटवर स्वागत आहे आज आपण या लेखात क्रेडिट कार्ड बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जसे की क्रेडिट कार्ड काय आहे ? त्याचे प्रकार किती ? क्रेडिट कार्ड वापरताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला असते इत्यादी सर्व.

क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?

Waht is Credit Card In Marathi | Credit Card Information in Marathi

आपण जेव्हा काही नवीन गोष्टी घेतो चे बिल देताना आपण कॅश, डिबेट कार्ड म्हणजेच एटीएम किंवा युपी आहे जसे की फोन पे, गुगल पे, पेटीएम इत्यादी याचा वापर करून पैसे देत असतो. या गोष्टींचा वापर करून जर आपण पेमेंट केले तर लगेचच आपल्या अकाउंट मधून पैसे कट होतात. पण क्रेडिट कार्डचे तसे नसते. तुम्ही क्रेडिट कार्ड अकाउंट मधून पैसे न काढता न कट होता बिल देऊ शकता आणि नंतर तुम्हाला काही कालावधीमध्ये क्रेडिट कार्ड चे पैसे परत द्यावे लागते. क्रेडिट कार्ड तुम्हाला काही वेळे पुरता बिना व्याजाने पैसे उधार देते हे तुम्ही बिल देण्यासाठी वापरू शकता.

काही अडचणीच्या वेळेस जेव्हा आपल्या अकाउंटला पैसे नसतात तेव्हा हे क्रेडिट कार्ड खूप फायद्याचे ठरते. तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरलेले पैसे निश्चित कालावधीमध्ये परत केले तर क्रेडिट कार्ड सेवा देणारी बँक तुमच्याकडून व्याज घेत नाही.

आपल्याला आपल्या आपत्कालीन किंवा अडचणीच्या काळात काही कालावधी करता ठराविक रक्कम व्याजाशिवाय वापरायला मिळते आणि म्हणून ही क्रेडिट कार्ड पद्धत उपयुक्त आणि लोकप्रिय झालेली आहे. पण जर आपण क्रेडिट कार्ड वापरताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर क्रेडिट कार्ड आपल्याला चांगल्या घाट्यात नेऊ शकते. आपल्याला क्रेडिट कार्ड वापरत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे? ते आपण पुढे या लेखात बघणारच आहोत.

क्रेडिट कार्डला लिमिट असतो का ?

Limit for Credit Card In Marathi | Credit Card Information in Marathi

हो. तर क्रेडिट कार्ड वापरताना आपल्याला लिमिट असते. ती लिमिट क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकेने ठरवलेली असते. जसे की जर तुम्हाला २० हजाराची लिमिट असेल, तर तुम्ही महिन्याला वीस हजारापर्यंत पैसे वापरू शकता. तुम्हाला क्रेडिट कार्डची लिमिट किती मिळते हे तुमच्या आर्थिक पद, तुमचा इन्कम, बँक चे नियम आणि क्रेडिट कार्डचा प्रकार यावरून ठरते. यात तुम्हाला क्रेडिट स्कोर देखील चेक करावा लागतो.

क्रेडिट कार्ड चे पैसे परत करण्याची सायकल किंवा कालावधी काय असतो ?

Payment Cycle for Credit Card Bill Payment | Credit Card Information in Marathi

क्रेडिट कार्डवर आपण वापरलेले पैसे क्रेडिट कार्ड नोंद करते आणि महिना संपल्यावर एक किंवा दोन तारखेला पुढच्या महिन्यात आपल्याला बिल देते. हे बिल भरण्यासाठी आपल्याला बँक 15 ते 20 दिवसाची मुदत देते. त्या मुदतीत आपण क्रेडिट कार्डचे बिल भरावे. उदाहरण अर्थ एक तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत तुम्ही जे क्रेडिट कार्डवर बिल पे केले किंव्हा पैसे वापरले आहे त्याचं बिल एक किंवा दोन तारखेला पुढच्या लगेच येणाऱ्या महिन्यात येईल आणि ते तुम्हाला येणाऱ्या 15 ते 20 दिवसात पेमेंट करावे लागेल.

जर या निश्चित केलेल्या कालावधीमध्ये तुम्ही क्रेडिट कार्डचे पेमेंट केले नाही किंवा क्रेडिट कार्डचे बिल भरले नाही तर तुम्हाला क्रेडिट कार्ड सेवा देणारी बँक व्याज आणि लेट पेमेंट केले म्हणून त्यावर एक शुल्क आकारण्यात येईल.

क्रेडिट कार्डवर वापरलेल्या पैशावर व्याज कधी लागते ?

Intrest on Credit Card | Credit Card Information in Marathi

महिना संपल्यावर लगेच एक किंवा दोन तारखेला आपल्याला बँक बिल देते आणि ते बिल भरण्यासाठी पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी मिळतो. जर या कालावधीमध्ये आपण क्रेडिट कार्ड चे पैसे भरले तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे व्याज किंवा शुल्क बँक आकारत नाही. मात्र जर आपण दिलेल्या कालावधीमध्ये पैसे भरले नाही, तर आपल्याला पुढील किती दिवसात पैसे देतो त्या दिवसाला व्याज आणि लेट पेमेंट करतोय म्हणून दंड देखील आकारला जातो. म्हणून आपण क्रेडिट कार्डचे पैसे बँकने ठरवलेल्या कालावधीमध्ये वापस करावे नाहीतर जास्तीचे व्याज आपल्याला द्यावे लागेल.

क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपन्या किंवा बँक का क्रेडीट कार्ड सेवेवर पैसे कसे कमावतात ?

Credit Card Information in Marathi

  • क्रेडिट कार्ड पुरवणाऱ्या कंपन्या किंवा बँका आपल्याला दिलेल्या कार्डवर वार्षिक शुल्क आकारते.
  • विविध प्रकारच्या खरेदीवर वेगवेगळे छुपे चार्ज आकारते.
  • जर आपण काही खरेदी करून करिअर कार्डवर EMI घेतला असेल तर त्यावर व्याज आकारले जाते. जसे की मी अमेझॉन वरून क्रेडिट कार्ड वापरून एमआय वर टीव्ही घेतला असेल तर त्या ईएमआय वर मला बँक भर रक्कम व्याज आकारते.
  • आपण कोणत्याही दुकानात क्रेडिट कार्डने बिल देतो त्या दुकानदाराकडून ठराविक रक्कम बँक प्रोसेसिंग फी म्हणून घेते.
  • जर आपण ठरवलेल्या कालावधीत क्रेडिट कार्ड चे पैसे भरले नाही त्यावर भर रक्कम व्याज बँक आकारते. हे व्याज वाढत जाते जसे की आपल्या गावातील सावकाराचे कर्ज वाढत जाते हा क्रेडिट कार्डचा सगळ्यात मोठा तोटा आहे तसेच आपण लेट पेमेंट करतोय म्हणून एक दंड म्हणून शुल्क देखील आकारला जातो.

क्रेडिट कार्डचे फायदे

Credit card Advantages | Credit Card Information in Marathi

  • क्रेडिट कार्डचे अनेक फायदे आहेत ते आपल्या वापरावर अवलंबून आहे तर आपण क्रेडिट कार्डचे मुख्य फायदे पुढीलप्रमाणे आहे
  • आपण बँक अकाउंट मधून पैसे न खर्च करता आपण पैसे वापरू शकतो
  • क्रेडिट कार्ड वरून बिल दिल्यामुळे आपल्याला कॅशबॅक, डिस्काउंट आणि बरेचशे रिव्हर्स पॉईंट मिळतात.
  • आपल्याला क्रेडिट कार्डवर वापरलेल्या पैशावर ठराविक कालावधीसाठी व्याज लागत नाही
  • जर आपण क्रेडिट कार्डचे बिल ठराविक निश्चित केलेल्या कालावधीमध्ये भरला तर आपला क्रेडिट स्कोर वाढतो. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचे लोन घेण्यास मदत होते.
  • आपण जितकी जास्त खरेदी करू तेवढे जास्त रिव्हर्स पॉईंट्स आपल्याला मिळतात.
  • क्रेडिट कार्ड फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे तर तुमची फसवणूक झाली आणि हे सिद्ध झाले तर बँक तुम्हाला ती रक्कम बिलामध्ये आकारत नाही या मुद्द्याची क्रेडिट कार्ड घेताना क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकेची खातर जमा करून घ्यावी
  • महिन्याच्या शेवटी क्रेडिट कार्ड खरेदीचा संपूर्ण तपशील मिळतो त्यावरून तुम्हाला तुम्ही कुठे, काय आणि किती पैसे खर्च केले हे लक्षात येते.

क्रेडिट कार्ड चे तोटे

Credit Card Disadvantages | Credit Card Information in Marathi

  • क्रेडिट कार्ड मध्ये खूप सारे छुपे चार्जेस असतात ते आपल्याला माहिती असायला हवे करीत कार्ड घेताना आपण याची खातर जमा करून घ्यावी
  • आपण जर वेळेत करीत कार्ड चेक बिल भरले नाही तर आपल्याला बँक भर रक्कम व्याज आकारते. तसेच उशिरा बिल भरल्यामुळे वेगळा शुल्क दंड म्हणून आकारला जातो. तितका उशीर आपण बिल भरायला करू इतके बँक शुल्क आणि व्याज जास्त आकारते.
  • क्रेडिट कार्ड वर पैसे मिळतात म्हणून आपण खरेदीवर नियंत्रण ठेवत नाही आणि बऱ्याच वेळा गरजेच्या नसलेल्या गोष्टी देखील खरेदी करतो
  • जर आपण क्रेडिट कार्डचा वापर करून ईएमआय वर काही खरेदी केली असेल तर त्या ईएमआय वर कार्ड देणाऱ्या कंपन्या भररक्कम व्याज आकारते.
  • जर आपण क्रेडिट कार्डचे बिल निश्चित कालावधीमध्ये भरले नाही तर आपला क्रेडिट स्कोर खराब होतो, त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचे लोन घेताना अडचण येऊ शकते.

क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरताना कुठली काळजी घ्यावी ?

Credit Card Information in Marathi

  • क्रेडिट कार्डच्या बिलाच्या प्रत्येक महिन्याला एकूण वापरलेल्या रकमेच्या केवळ 5 टक्के रक्कम भरणे अनिवार्य असते; मात्र आर्थिक भूर्दंड वाचविण्यासाठी तुम्ही पूर्ण रक्कम भरावी.
  • क्रेडिट कार्ड वरून रोख रकमेवर व्याज शुल्क कालावधी मिळत नसल्यामुळे जर आपण कॅश काढली तर शुल्क आकारले जाते. तर आपण कॅश काढले नाही तर आपले नुकसान होणार नाही म्हणून शक्यतो क्रेडिट कार्डचा वापर ऑनलाइन बिल किंवा कार्ड swap मशीन मधून पेमेंट करतानाच करावा म्हणजे कॅश काढल्यामुळे त्यावर आपल्याला शुल्क द्यावा लागणार नाही.
  • आपल्या उत्पन्नापेक्षा किंव्हा मिळणाऱ्या महिन्याच्या पगारापेक्षा कमी मर्यादा असणारे क्रेडिट कार्ड घ्यावे.
  • आपल्याला बँक क्रेडिट कार्डची जी लिमिट ठरवून दिलेली आहे त्याचे फक्त तीस ते पन्नास टक्के वापरावे नाहीतर आपला क्रेडिट स्कोर कमी होतो. उदाहरण अर्थ जर मला 30000 ची लिमिट असेल तर मी पंधरा हजारापर्यंत त्या कार्डचा वापर करावा
  • क्रेडिट कार्डवर क्रेडिट कार्ड सेवा देणाऱ्या कंपन्या किंवा बँका विविध प्रकारचे छुपे शुल्क आकारते, ते आपण बँक मधून कार्ड घेताना व्यवस्थित चेक करावे आणि खातर जमा करावी.
  • ऑनलाइन शॉपिंग करत असताना क्रेडिट कार्डवर ईएमआय वापरून खरेदी केली तर त्यावर तुम्हाला अधिक शुल्क द्यावा लागेल. तो शोध तुम्ही ईएमआय घेताना व्यवस्थित चेक करून घ्यावा
  • कार्ड हरविल्यास त्वरित कार्ड बंद करावे.
  • क्रेडिट कार्डबद्दलची कोणतीही माहिती कोणासही देऊ नये जशे कि  ओटीपी, पासवर्ड इत्यादी.

क्रेडिट कार्ड कोणी वापरू नये किंवा क्रेडिट कार्ड कोणासाठी नाही.

Credit Card Information in Marathi

  • फक्त रिव्हर्स किंवा डिस्काउंट किंवा कॅशबॅक भेटतात म्हणून क्रेडिट कार्ड घेऊ किंवा वापरू नये.
  • ज्यांच्याकडे  पैसे मुबलक नाही किंवा आर्थिक परिस्थिती बिकट आहे असे लोक क्रेडिट कार्ड वापरतील पण बिल न भरल्यामुळे त्यांना खूप व्याज भरावे लागेल आणि त्यांना मोठा तोटा होऊ शकतो.
  • ज्यांचा आपल्या खर्चावर नियंत्रण नसते असे लोक देखील क्रेडिट कार्डचा वापर टाळावा कारण आपल्याकडे पैसे नसताना देखील आपण क्रियेट कार्ड वर खूप सारी खरेदी करू शकतो आणि करू शकत असल्यामुळे नंतर क्रेडीट कार्ड चे बिल भरताना आपलीच फजिती होते.
  • क्रेडिट कार्डचे बिल आल्यावर ते बँकेने निश्चित केलेल्या वेळेतच बिल भरून टाका त्यामुळे तुम्हाला व्याज लागणार नाही आणि तुमचा क्रेडिट स्कोर देखील चांगला राहील.
  • क्रेडिट कार्ड गरजेच्या खरेदीसाठीच वापरा नाहीतर तुमचे खर्चावर नियंत्रण राहणार नाही आणि आवश्यक नसलेल्या गोष्टी देखील तुम्ही खरेदी कराल.
  • क्रेडिट कार्ड घेताना सर्व कागदपत्रे आणि आकारले जाणारे शुल्क व्यवस्थित तपासून घ्या
  • क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या ऑफर्स त्या कार्डच्या प्रकारावर ठरते आणि कार्डच्या प्रकारावर त्याला वार्षिक फी किती असते ते देखील ता ठरते त्यामुळे हे व्यवस्थित तपासून घ्या

Top 5 Books For Share Market Fundamental Analysis In Marathi | शेअर मार्केट फंडामेंटल ॲनालिसिस साठी उत्तम पुस्तके

Top 5 Share Market Books for Beginners In Marathi | शेअर मार्केटसाठी उत्तम मराठी पुस्तके | Stock Market books for Beginners

क्रेडिट कार्ड वापरावे की नाही ?

Credit Card Information in Marathi

क्रेडिट कार्ड वापरण्याचे खूप सारे फायदे आहे तसेच काही तोटे देखील आहे. या लेखात आपल्याला समजले असेलच की फायदे काय आहे आणि तोटे काय आहे. आपण आपल्या गरजा आणि व्यवहारानुसार ठरवले पाहिजे की आपण क्रेडीट कार्ड वापर्याला पाहिजे कि नाही ? ते तुमच्यावर अवलंबून आहे हा निर्णय आपण अभ्यास करून घ्यावा धन्यवाद

Join Telegram GroupJoin